HASSAN MUSHRIF 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : ग्रामीण भागात पाच कोटी नागरिकांना अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध मोफत देण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावर उपाययोजना करुनही दिवसेदिंवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. महाराष्ट्रात अडीच महिन्यात या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यावर मात करण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला जात आहे. परंतु अद्यापही ठोस औषध निघालेले नाही. मात्र, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषध उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामविकास विभाग हे औषध देण्यासाठी पुढे आला आहे. राज्यातील पाच कोटी नागरिकांना हे औषध मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात व देशात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीचे औषध चर्चेत आले. भारत सरकारचे आयुष मंत्रालय हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे आणि या उपचार पध्दती रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याचा विकास व्हावा या तत्त्वावर आधारित आहेत. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी जे शक्य होईल ते करायला हवे. आयुर्वेदिक औषध रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती क्षमता वाढवण्यास मदत करतं. अर्सेनिक अल्बम ३० या औषधावर संशोधन झालं असून ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आयुर्वेदीक औषध उत्तम कामगिरी करत आहे. 

लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करोना व्हायरसची लागण होत आहे. अशावेळी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे. त्यात करोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी  चर्चेत असलेले अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषधांचा वापर केला पाहिजे असे सर्वत्र सांगितले जात आहे. जेणेकरुन लोकांना करोना व्हायरसपासून लढण्यासाठी तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्ती येईल. सरकारकडून ग्रामीण भागात पाच कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध मोफत देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तत्काळ जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला आवश्यक त्याप्रमाणे कमीतकमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. खरेदी खर्चाची रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे. लवकरच आता ग्रामीण भागातील लोकांना या औषधांचा लाभ मिळणार आहे.

मुश्रीफ यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ग्रामीण भागातील पाच कोटी नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषध मोफत देण्यात येणार आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, तुमच्या शहरात काय आहे ताजा भाव? जाणून घ्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

Explained : बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातील सामने खेळण्यास नकारच दिला तर काय? त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल?

धक्कादायक! धनसंपत्तीच्या हव्यासापोटी चक्क नरबळीचा प्रयत्न; 8 महिन्यांच्या बाळाची थरारक सुटका, सय्यद इम्राननं असं का केलं?

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

SCROLL FOR NEXT