Ujjwala-Yojana
Ujjwala-Yojana 
महाराष्ट्र

गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी; उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ३ महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेअंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ पुणे जिल्ह्यातील एक लाख 40 हजार ग्राहकांना मिळणार आहे.

केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना एप्रिल ते जून 2020 या दरम्यान तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या नोडल ऑफिसर चित्रा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सिलिंडर खर्चाची रक्कम उज्वला गॅस लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर ग्राहकाला सिलिंडर खरेदी करता येईल. पीएमयुवाय ग्राहकाला दर महिन्याला एक सिलिंडर मिळणार आहे. शेवटचा सिलिंडर मिळाल्यानंतर 15 दिवसानंतर लाभार्थी ग्राहकाला पुढील सिलिंडर बुक करता येईल. सिलिंडर रिफीलसाठी बुकिंग नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे करणे आवश्यक आहे. 

लॉकडाऊन कालावधीत एलपीजी वितरकांकडे पुरेसा साठा आहे. त्यात कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये किंवा साठा करू नये.

एलपीजी इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांक : 1906
सिलिंडर रिफिल करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक : 
इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOC) : 7588888824
हिंदुस्तान पेट्रोलियम (HP) : 9222201122
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC) : 7710955555 

एलपीजी कर्मचाऱ्यांना पाच लाखांचे विमा संरक्षण

एलपीजी शोरूम कर्मचारी, गोडाऊन कीपर, मेकॅनिक, डिलिव्हरी बॉईज, रिटेल आउटलेट कर्मचारी, सिलिंडर वाहतूक करणारे ट्रकचालक यांच्यासह सर्व एलपीजी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात. कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही सिलिंडर घरपोच पुरवठा करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना दुर्देवाने काही झाल्यास त्यांच्या वारसदारास पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT