Gadgebaba Death Anniversary
Gadgebaba Death Anniversary esakal
महाराष्ट्र

Gadgebaba Death Anniversary : माझा कोणीही शिष्य नाही म्हणणारे गाडगेबाबा या संताना मानायचे आपला गुरु

सकाळ डिजिटल टीम

Gadgebaba Death Anniversary : गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे परीट जातीत  झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व  आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार.त्यांचे त्यांच्या आईने ठेवलेले मूळ नाव डेबूजी. शेणगावचे घरंदाज नागोजी परीट यांचे हे पणतू. यांचे घराणे मूळचे सुखवस्तू. व्यवसाय शेतीचा; परंतु त्याकाळच्या अनेक वाईट रूढींमुळे झिंगराजींना विपन्नावस्था आली. अशा परिस्थितीतच व्यसनाधीनतेमुळे गाडगेबाबा यांच्या वडिलांचे कोतेगाव येथे निधन झाले.

डेबूजींना लहानपणापासूनच भजन-कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारण व लोकशिक्षण यांसाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर होते तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांत व महाराष्ट्रात त्यांनी कीर्तने करून लोकजागृती केली.

भजन-कीर्तनांतून प्रश्नोत्तररूपी संवाद हे डेबूजींचे वैशिष्ट्य होते. चोरी करू नये, तसेच चैन, देवाची यात्रा, दिवसवारे हे प्रकार कर्ज काढून करू नये, देवा-धर्माच्या नावाने नवस-सायास करू नये, यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नये, शिवाशीव पाळू नये, दारू पिऊ नये, हुंडा देऊ-घेऊ नये, आई-वडिलांची सेवा करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, मुलांना शिकविल्याविना राहू नये, हे त्यांच्या कीर्तनांतून समाजप्रबोधनाचे मुख्य विषय असत. ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ असा गजर ते मुद्द्याच्या शेवटी करत व त्यात श्रोत्यांनाही सामील करून घेत.

श्रोत्यांना सहभागी करून घेणे हे त्यांच्या कीर्तनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.डेबूजी पुढे गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे व एक काठी (सोटा) असा त्यांचा वेश असे. त्यामुळे ते गाडगेबाबा, गोधडे महाराज या नावांनीही प्रसिद्ध होते. त्यांशिवाय प्रदेशपरत्वे ते चिंधेबुवा, लोटके महाराज, चापरेबुवा, वट्टीसाधू इ. नावांनीही परिचित होते. 

स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही  असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला.

अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी  समाजास दिली.

‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही. समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व  त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.

गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT