Ganesh Chaturthi 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Ganesh Chaturthi : यंदा बाप्पाचं आगमन 19 दिवसांनी लांबणार; 'या' कारणामुळं सणात विघ्न, 28 सप्टेंबरला विसर्जन

हिंदू पंचांगानुसार (Hindu Panchang) यंदा मराठी वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

यंदा श्रावणातील धार्मिक व शुभकार्ये श्रावणाच्या पहिल्या महिन्यात न होता दुसऱ्या महिन्यात होणार आहेत.

चिपळूण : १९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे (Ganesh Chaturthi 2023) आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्टला गणेशाचे आगमन झाले होते. यंदा १९ सप्टेंबरला गणेशाचे आगमन होणार आहे.

दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. यंदा हा मास श्रावण महिन्यात (Shravan month) आला असून, १९ वर्षांनंतर हा योग आला आहे. हिंदू पंचांगानुसार (Hindu Panchang) यंदा मराठी वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. यंदा श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे श्रावण महिना तब्बल ५९ दिवसांचा असणार आहे.

त्यामुळे यावर्षी श्रावणाचे दोन महिने मानले जाणार आहेत. त्यामुळे यंदा श्रावणातील धार्मिक व शुभकार्ये श्रावणाच्या पहिल्या महिन्यात न होता दुसऱ्या महिन्यात होणार आहेत. यावर्षी मंगळवारी, (ता. १८) जुलैपासून अधिक मास सुरू होणार असून, तो १६ ऑगस्टला संपणार आहे तर २६ ऑगस्टला अधिक मासाची सांगता होणार आहे.

याचा परिणाम हिंदू सणांवरही होणार आहे. रक्षाबंधनाचा सण अधिक मास आल्याने ४६ दिवसांनंतर म्हणजेच ३० ऑगस्टला होणार आहे. याचबरोबर गणेशाचे आगमनही लांबणार आहे. यंदा श्रावणात आलेल्या अधिक मासामुळे विघ्नहर्त्याचेही आगमन लांबले आहे.

भक्तांना तब्बल १९ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा १९ ला गणेश चतुर्थी आली आहे तर पाचव्या दिवशी म्हणजे २३ ला गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे तर दहा दिवसांच्या बाप्पांना २८ सप्टेंबरला निरोप दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या बालेकिल्ल्यातच ACB ची 'रेड'; महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 50 हजारांची मागणी अन् 15 हजारांत...

Pune APMC: पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा; विरोधक आक्रमक, अहवाल सादर करण्याचे आदेश!

CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

SCROLL FOR NEXT