Ganesh festival in abroad sakal
महाराष्ट्र बातम्या

Ganesh festival in abroad : परदेशातही विराजमान होतात गणपती बाप्पा

‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ या नावाने साजरा होणारा हा देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो.

नमिता धुरी

मुंबई : ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात युनायटेड इंडियन ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया ही संघटना दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करते. यासाठी लालबागहून मूर्ती मागवली जाते. ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ या नावाने साजरा होणारा हा देशाबाहेरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो.

ऑस्ट्रेलियातील टायटेनिअम सिक्युरिटी एरिना या भव्य इनटोअर स्टेडियममध्ये दोन दिवस हा उत्सव पार पडतो. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांची पालखी निघते. पारंपरिक पोषाखात लेझीमचे सादरीकरण ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर केले जाईल. ऑस्ट्रेलियातील नेते कलाकारांसह, स्थानिक आणि परदेशी पाहुणे हजेरी लावतात.

‘ऑस्ट्रेलियाच्या राजा’ची महाआरती आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. गेल्या वर्षी या ठिकाणी १०१ जोडप्यांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष जपाचं पठणदेखील करण्यात आले होते.

इंग्लंडमध्ये कोव्हेंट्री येथे राहणाऱ्या आणि जॅगवार लँड रोव्हर कंपनीत डिझाइन इंजिनिअर असलेल्या शीतल चिमड यांनी तेथे गणेशोत्सव सार्वजनिक केला आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या निमित्ताने चिमड यांनी २००हून अधिक भारतीयांना एकत्र आणले आहे. ते इंग्लंडमध्येच कार्यशाळा घेऊन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून घेतात.

अमेरिकेतील खांडगे कुटुंबानेही तेथे गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. त्यांच्या घरी पौराणिक कथेचा संदर्भ घेऊन देखावा उभारला जातो. उकडीचे मोदक, पुरणपोळी, शिरा, इत्यादी पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. अमेरिकेतील अनेक भारतीय कुटुंबे येथे दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT