Ganesh Visarjan and Death News
Ganesh Visarjan and Death News Ganesh Visarjan and Death News
महाराष्ट्र

Ganesh Visarjan : महाराष्ट्रात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू; अनेक जखमी

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Visarjan and Death News नवी दिल्ली : महाराष्ट्रात गणपती विसर्जनादरम्यान (Ganesh Visarjan) २० जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता हा आकडा वाढला आहे. मृतांमध्ये महिलेचाही समावेश आहे. विसर्जनाच्या आधी झालेल्या आरतीदरम्यान झाड पडल्याने एकाला जीव गमवावा लागला. त्याचवेळी विसर्जनाच्या वेळी विजेचा धक्का लागून ११ जण जखमी झाले होते.

१० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर शनिवारी सकाळपर्यंत मुंबईतील विविध पाणवठ्यांमध्ये ३८,००० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शहरात काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरूच होत्या, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील कृत्रिम तलाव आणि इतर काही जलकुंभांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि इतर लोकप्रिय गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी हे प्रमुख ठिकाण आहे. शिवाजी पार्क, वांद्रे, जुहू आणि मालाडसह शहरातील इतर समुद्रकिनाऱ्यांवरही मूर्तींचे विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनच विसर्जन मिरवणूक निघण्यास सुरुवात झाली होती. कोरोनामुळे दोन वर्षांपासून निर्बंध लागू असल्याने यंदा महाराष्ट्रासह देशभरात १० दिवसांचा हा सण विशेष उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.

राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) आठ कंपन्या, जलद कृती दलाची एक कंपनी आणि ७५० होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएमसीने ७३ नैसर्गिक आणि १६२ कृत्रिम पाणवठ्यांमध्ये विसर्जनाची सोय केली होती. सुमारे १०,००० स्वयंसाहाय्य कर्मचारी तैनात केले होते.

महाराष्ट्रात गणपती विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये एकूण २० जणांना जीव गमवावा लागला आहे. यात १४ जणांचा बुडून मृत्यू झाला तर ४ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. एकाच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू झाला आणि दुसऱ्याच्या सिमेंटवर पडल्याने मृत्यू झाला, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT