Ganeshotsav 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाच्या तोंडावर सोलापूरात रडतोय बाप्पा

सोलापूरमध्ये गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याने तिथे भाविकांनी गर्दी केली आणि श्रीफळ, फळे अर्पण केले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

हायलाइट्स

  • गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची माहिती मिळाली आणि मंदिरात गर्दी उसळली

  • भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले

  • भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – अंधश्रध्दा निर्मूलन समिती

गणपती दूध पितो, देवीने डोळे बंद केले, देवळातील नंदीने दूध पिलं, हनुमानाने प्रसाद खाल्ला अशा बातम्या किंवा चर्चा आपण अनेकवेळा ऐकल्या असतील. परंतु आता तर गणपती बाप्पा रडत असल्याचं सांगितलं जात आहे. सोलापुरातील होटगी- कुंभारी रस्त्यावरील गणपती मंदिरात बाप्पा रडतोय या बातमीनं तोबा गर्दी केली.

एरव्ही शांत असलेल्या या गणपती मंदिरात आज अचानक भाविकांची गर्दी का वाढली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. भाविकांची गर्दी इतकी का वाढली याचा शोध घेतल्यानंतर भुवया उंचावणारी बाब सर्वांसमोर आली. देऊळातील गणपती रडत असल्याची माहिती एका भक्ताने दिली. याच कारणामुळे मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाविक गणपतीच्या डोळ्यातील पाणी पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी या ठिकाणी मंदिरात येत आहेत.

भाविकांनी गर्दी करून अर्पण केले हार, श्रीफळ

मिळालेल्या माहितीनुसार, ही अफवा बघता बघता आजूबाजूच्या गावात पसरली. माहिती मिळताच भाविकांचा ओघ दर्शनासाठी मंदिराकडे वाढला. भाविकांनी लगेच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले आहे.

ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण समोर येईल – अंनिस

हे गणपती मंदिर हे कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी परिसरात पसरली. ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर देखील दर्शनासाठी नागरिक आणि भक्त गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT