Laser Show Sakal
महाराष्ट्र बातम्या

Laser Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; कोल्हापुरात 63 जणांच्या डोळ्याला इजा

दत्ता लवांडे

कोल्हापूर : दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर झालेला गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. दरम्यान, गणेश उत्सव मिरवणुकीतील लेझर शो घातक ठरले आहेत. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे ६३ जणांच्या डोळ्याला इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर डोळ्याला इजा होणाऱ्या रूग्णांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली असून कोल्हापूर जिल्हा नेत्र संघटनेने ही माहिती दिली आहे.

(Laser Show Harmful For Eyes Latest Updates)

दरम्यान, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. तोच लेझर शो आता चिंतेचा विषय ठरला असून यामुळे अनेक जणांच्या डोळ्याला इजा झाल्या आहेत. त्याचबरोबर मोबाईलवरही परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. तर लेझर शो मुळे होणाऱ्या इजा लक्षात घेता पोलिसांनी मंडळांना परवानगी नाकारली होती पण काही मंडळांनी पोलीस परवानगीशिवाय लेझर शो केल्याचं समोर आलं आहे.

कोल्हापुरातील या लेझर शोचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. तर या मिरवणुकीत अनेक लहान मुले आणि जेष्ठ नागरिक सामील झाले होते. यामुळे डोळ्याला झालेल्या समस्या वाढताना दिसत असून हळूहळू इजा झालेल्या लोकांची माहिती समोर येऊ शकते अशी माहिती आहे. त्याचबरोबर अनेकांच्या फोनला सुद्धा यामुळे समस्या आल्या आहेत. या रूग्णसंख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT