MD Drugs Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूर शहरात ‘MD’ ड्रग्ज पुरविणारी टोळी जेरबंद, सोलापूरच्या शेळगीतील मोहसीन शेख मुख्य पेडलर; धागेदोरे मुंबईपर्यंत, ८ मोबाईल पोलिसांनी केले जप्त

सोलापूर शहरात एक वर्षापासून ‘एमडी’ ड्रग्जचा अनेकांना पुरवठा करणारा मुख्य पेडलर मोहसीन इस्माईल शेख याच्यासह आठजणांना ग्रामीण पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी जेरबंद केले. पाकणीजवळ सापळा रचून पोलिसांनी संशयितांची गाडी (केए ०५/एमएक्स २९४२) पाठलाग करून पकडली. गाडीच्या डिक्कीतील टायरजवळ त्यांनी १८ ग्रॅम ड्रग्ज ठेवले होते. ते मुंबईतून ड्रग्ज आणत होते, असे त्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात एक वर्षापासून ‘एमडी’ ड्रग्जचा अनेकांना पुरवठा करणारा मुख्य पेडलर मोहसीन इस्माईल शेख याच्यासह आठजणांना ग्रामीण पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी जेरबंद केले. पाकणीजवळ सापळा रचून पोलिसांनी संशयितांची गाडी (केए ०५/एमएक्स २९४२) पाठलाग करून पकडली. गाडीच्या डिक्कीतील टायरजवळ त्यांनी १८ ग्रॅम ड्रग्ज ठेवले होते. ते मुंबईतून ड्रग्ज आणत होते, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या सर्वांचे मोबाईल जप्त केले असून त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच जण सोलापूर शहरात ड्रग्ज पुरवठा करीत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

कर्नाटक पासिंगच्या गाडीतून पुण्यातून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या संशयित आरोपींकडे ‘एमडी’ ड्रग्ज असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके नेमली होती.

सोलापूर- पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका, पाकणी फाटा व कोंडीजवळ, अशी तीन पथके दबा धरून बसली होती. टोल नाक्यावरील पथकाला हुलकावणी देऊन पुढे आलेली गाडी पाकणी फाट्याजवळील पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने पाठलाग करून सिमको कंपनीजवळील ब्रिजवर पकडली. कमी काळात जास्त पैसा कमविण्याच्या नादात कर्जबाजारी तरुण एकत्रित येऊन हा अवैध व्यवसाय करीत होते. एक वर्षापासून ते ड्रग्ज आणून मध्यरात्री मागणीनुसार सबंधितांना पुरवत होते, अशीही बाब तपासात समोर आली आहे.

‘एडी’ ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी

मोहसीन इस्माईल शेख, इरफान इस्माईल शेख (दोघेही रा. कुमारस्वामी नगर, शेळगी), मुजफ्फर अब्दुल जब्बार शेख (वय ३१, रा. गणेश पेठ, हिंगुलांबिका मंदिराजवळ), मुबारक राजअहमद शेख (वय ३२, रा. आदर्श नगर, शेळगी), अस्लम महम्मद युसूफ बागवान (वय ४५, रा. विडी घरकूल, हैदराबाद रोड) हे सोलापूर शहरात एमडी ड्रग्ज पुरवठा करणारे संशयित आरोपी आहेत. त्यांच्यासमवेत ग्रामीण पोलिसांनी याकुब अली बागवान (वय ५१, रा. मम्मत पुरा, जि. कलबुर्गी), मोहम्मद मतीन हाजी शेख (वय ४९, रा. दर्गा रोड, घट्टेवाडी, मोमनपुरा, कर्नाटक), बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान (वय ३७, रा. बटली अलावा, मोमीनपुरा, कलबुर्गी) यांना अटक केली.

प्रतिग्रॅम ४००० रुपये किमतीचे ड्रग्ज

‘एमडी’ ड्रग्ज हे नशेसाठी वापरले जाते. पाण्यात टाकून, गुटखा किंवा पानात टाकून ते खातात. या ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम चार हजार रुपये आहे. मुंबईतून आणलेले एमडी ड्रग्ज हे संशयित आरोपी सोलापूर शहरातील विविध भागात मागणीनुसार पुरवठा करीत होते, अशीही माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात शहरातील आणखी काहीजणांचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय कर्नाटकातील तीन संशयित आरोपी सोलापुरातील संशयितांसोबत कसे, मुंबईतून ते कोठून ड्रग्ज आणत होते, याचा तपास सुरू आहे.

आठ जणांसाठी सात वकिलांचा युक्तिवाद

‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपींना चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सोमवारी (ता. ११) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना दहा दिवसांची वाढीव कोठडी मागितली होती, पण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. आठ संशयितांसाठी सात वकिलांनी युक्तिवाद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: W,W,W,W! छा गए 'मियां भाई'; Mohammed Siraj ने मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम, WTC मध्ये...

Pune Mastan Baba News : गेली २५ वर्षे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात फिरणारे मस्तान बाबा कोण? शेकडो लोक घेतात दर्शन...

अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा करायचंय लग्न! नवीन इनिंगबद्दल बोलताना म्हणाली...'योग्य जोडीदार...'

ऐकावे ते नवलंच! महिलेने 55 व्या वर्षी दिला 17 व्या मुलाला जन्म; पती म्हणतो, 'उदरनिर्वाहात मोठ्या अडचणी येत आहेत'

IND vs WI 1st Test Live: दुबईहून 'हॉटसीट'...! Ravi Shastri असं काही म्हणाले, ज्याने पाकिस्तानच्या बुडाला लागली आग, Video

SCROLL FOR NEXT