Dawood Ibrahim esakal
महाराष्ट्र बातम्या

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; 'या' गावात उद्या लागणार बोली

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी (ता. ५) लिलाव होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास ११ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.

खेड : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी (ता. ५) लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहेत. शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत.

गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास ११ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. तालुक्यातील मुंबके (Mumbake Village) येथील दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे.

दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबर २०२३ ला नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम कास्करचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. तीन वर्षांपूर्वी देखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. खेड तालुक्यातील लोटे येथील मालमत्तेचाही लिलाव करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT