महाराष्ट्र बातम्या

कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर; मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

सकाळ डिजिटल टीम

Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway : आगामी गणपतीकाळात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी अवजड वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

या वाहनांना असणार बंदी

उत्सवकाळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ज्या वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त असणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांचा समावेश असणार आहे. याशिवाय पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरुन होणाऱ्या वाळूच्या ट्रक, ट्रेलरच्या वाहतुकीबाबतदेखील मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 1915 मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन आदेश जारी केले आहे.

दरम्यान, अवजड वाहनांच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांना वगळण्यात आले आहे.

कोकणी लोकांसाठी गणेशोत्सव हा सर्वाधिक मोठा उत्सव आहे. यानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील बहुतांश चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय असते. त्यात जर एखादे अवजड वाहन बंद पडले तर, त्याचा परिणाम सर्व वाहतूकीवर होतो आणि कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT