Ganpati visarjan 2023 Pune Ganesh Festival Rangoli  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Ganpati visarjan 2023 : पुण्यातला गणेशोत्सव म्हटल्यावर चर्चा होणारच, बाप्पाच्या स्वागतासाठी चार किलोमीटरची रांगोळी

सालाबादप्रमाणे याही वर्षी लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक सार्वजनिक मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली आहे.

युगंधर ताजणे

Ganpati visarjan 2023 Pune Ganesh Festival Rangoli : जगभरामध्ये पुण्यातला गणेशोत्सव हा प्रसिद्ध आहे. गणरायाचे जंगी स्वागत, त्या स्वागतासाठी केलेली आरास हे पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातील भाविक येतात. त्यात खास परदेशी पाहुण्यांचाही सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून येते. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

सालाबादप्रमाणे याही वर्षी लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक सार्वजनिक मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली आहे. रथाचे सुशोभिकरण करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच चर्चा आहे ती पुण्यातल्या ज्या मार्गावरुन गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरु आहे त्या चार मार्गांची. त्यात लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्ता. या चारही मार्गावर एकुण चार किलोमीटर लांबीची रांगोळी साकारण्यात आली आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

पुण्यातल्या राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे. याविषयी अधिक माहिती देताना अकादमीच्या कलाकारांनी सांगितले की, यासगळ्यासाठी साडेतीनशेपेक्षा अधिक कलाकार मेहनत घेत आहे.बाप्पाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असून त्यानिमित्तानं बाप्पाला आनंदानं निरोप दिला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे अकादमीच्या वतीनं सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये अकादमीच्यावतीनं सायबर क्राईम विषयी प्रबोधन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय कला अकादमीनं विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुण्यातील अलका चौकात देखील तब्बल शंभर फुट रांगोळी साकारण्यात आली आहे तर ज्या मार्गावरुन मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीचे आगमन होणार आहे त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.

कला अकादमीचे हे पंचवीसावे वर्ष असून पुण्यातल्या एकुण सोळा चौकांमध्ये रांगोळी साकारण्यात आली असून भाविक, प्रेक्षक आणि नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.त्यांनी कला अकादमीच्या कलाकारांना धन्यवाद देत शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT