Ganpati Visarjan in Konkan Tragic River Accident: राज्यभरात अनेक ठिकाणी आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या दरम्यान कोकणातून एक दुखद बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये ही दुदैवी घटना घडली आहे.
या ठिकाणी जगबुडी नदीत गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी उतरलेली तीनजण वाहून गेली होती, सुदैवाने यातील दोनजण कसेबसे किनाऱ्यापर्यंत पोहचले तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी खेड पोलीस तसेच रेस्क्यू टीमचे कर्मचारी देखील दाखल झाले आहेत.
दरम्यान , पावसाने उघडीत दिल्याने रायगड जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतींचे निर्विघ्न विसर्जन पार पडले. पाऊस नसल्याने विसर्जन मिरवणुका थोड्या उशिरानेच सुरू झाल्या. टाळमृदंग, भजन आणि पारंपरिक नृत्यात निघालेल्या मिरवणुकांसाठी विसर्जन मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक मार्गांवर बदल करण्यात आले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. निर्माल्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने जनजागृती केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.