Gautam Adani Meet Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Gautam Adani Meet Sharad Pawar: रात्रीस खेळ चाले, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शुक्रवारी रात्री उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी तब्बल तीन तास ही बैठक झाली. राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आगे.

अदानी हे मोदी आणि पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आता अदानी महत्वाची भूमिका निभावणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने खळबळ उडत आहे. राष्ट्रवादीच फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात बैठक झाली आहे.

गौतम अदानी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. ही भेट शिष्टाचार आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सट्टेबाजीचा बाजार तापला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात बंड करत भाजपला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural Dragon Processing Industry : सांगलीच्या दुष्काळी तालुक्यात ड्रॅगन फ्रुटपासून वाईन निर्मीती; ३५ हजार लिटरचे उत्पादन, फळप्रक्रिया उद्योगाची नवी संधी

Sonia Gandhi: आत्मचरित्र खाेटेपणाचा कळस, नरसिंह राव यांच्या नातवाची सोनिया गांधींवर टीका

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख

Sugarcane Farmers: ओंकार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; १०० रुपये प्रतिटनचा हप्ता खात्यावर

Farmer Crop Loss: मोहळी-कोहळी येथील नामदेवराव काळे यांच्या साडेआठ एकरातील तूर, कपाशी नष्ट; ‘एक धोती घेऊ शकत नाही, हे प्रेस्टिज आहे कास्तकाराची’

SCROLL FOR NEXT