ST Strike News Updates Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

तिढा सुटला? आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विलीनकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 22 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही. तसेच पुन्हा असे वर्तवणूक केले जाऊ नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असेही हाय कोर्टने निर्देश दिले आहेत.

22 एप्रिलपर्यंत जे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे निर्देशहाय कोर्टने दिले आहेत. तसेच कुठल्याही कामगारावर कारवाई नको, असंही त्यांनी आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचेही आदेश दिले आहेत. कोविडचा भत्ता देण्याचेही स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रत्येक डेपोला ९५ लाख कोविड भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत लिखित आदेश वाचू, कारण सरकारवर आमचा विश्वास नाहीये. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT