Police action underway following the midnight arrest of BJP leader Balraje Pawar in Gevarai after a dispute during municipal election voting.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

BJP Leader Balraje Pawar Arrested in Gevarai : तीन महिन्यापुर्वीच जन्मठेपेच्या शिक्षेतून झाली होती सुटका; अटकेनंतर गेवराईत तणावपूर्ण वातावरण

Mayur Ratnaparkhe

BJP leader Balraje Pawar Latest News : राज्यभरात काही दिवसांपूर्वी नगरपालिका निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीस अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटनांमुळे गालबोट लागल्याचे दिसून आले. गेवराईतही २ डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना भाजपचे बाळराजे पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.

कारण, गेवराई नगरपालिका निवडणुकीत एकप्रकारे पवार विरुद्ध पंडीत अशा दोन राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यातूनच या दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा झाल्याचे दिसून आले. एवढच नाहीतर गेवराईतील मतदानाच्या दिवशी झालेला हा राडा म्हणजे जीवे मारण्याच्या षडयंत्राचा भाग होता, असा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला होता.

या दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेक आणि हाणामारीमुळे गेवराईतील वातावरण बिघडले होते. आता या प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधु व भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांचे पती बाळराजे पवार यांना अटक करण्यात आली आहे. मात्र बाळराजे पवार हे रात्री स्वतःहून गेवराई पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. हल्लेखोरांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची तसेच पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करत कारवाई करेल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानूसार गेवराई पोलिसांनी  50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यात बाळराजे पवार यांचाही समावेश होता.

विशेष म्हणजे बाळाराजे पवार यांची तीन महिन्यापुर्वीच जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका झाली होती. वीस वर्षापुर्वीच्या एका खून प्रकरणात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर लगेचच त्यांनी गेवराई नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी पत्नी गीता यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारीही मिळवून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT