girish mahajan
girish mahajan esakal
महाराष्ट्र

अजितदादा, जयंत पाटील, अन् मला सिनेमात काम द्या - गिरीश महाजन

सकाळ डिजिटल टीम

जामनेर (जळगाव) : भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी एका कार्यक्रमा दरम्यान चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि राधाकृष्ण विखेपाटील (Radhakrishna Vikhe Patil_ यांना सिनेमात घेण्याची विनंती एका निर्मात्याला केली. आणि राजकीय चर्चेला उधाण आले. महाजनांच्या अशा अजब मागणीमुळे एकच चर्चा होत आहे.

अजितदादा, जयंत पाटील, विखेपाटील अन् मला सिनेमात काम द्या

जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.

अनेकदा ‘संकटमोचक’ ठरले

फडणवीस सरकार संकटात असताना महाजन अनेकदा ‘संकटमोचक’ ठरले. महाजन हे जळगावातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT