महाराष्ट्र

...अन्‌ मुलीचीही निघाली वरात ! (व्हिडिओ)

भूषण काळे

अमरावती : अनेकदा मुलाची घोड्यावरून किंवा बग्गीत नवरदेव राशी निघते. लग्नाच्या अगोदर ही नवरदेव राशी काढली जाते. मुलगा घोड्यावर बसून त्याच्यासमोर बँडबाज्याच्या तालावर नातेवाईक मनसोक्त नाचताना सर्वांनीच बघितले असेलच. परंतु या सर्व रुढी-परंपरेला फाटा देत एका पित्याने आपल्या मुलीची वरात काढून नवा पायंडा पाडून मुले-मुली समानतेचा संदेश दिला.

यशोदा नगरातील गल्ली क्रमांक एकमधील रहिवाशी सिद्धार्थ सोनोने यांची मुलगी शीतल हिचा 2 फेब्रुवारीला शहरातच विवाहसोहळा आहे. जळगाव खान्देशमधील अयोध्या नगरातील रवींद्र बिहाडे यांच्याशी शीतल ही विवाह बंधनात अडकणार आहे. दोघेही जोडपे उच्चशिक्षित आहेत. मुलाप्रमाणे आपल्या मुलीचीही वरात काढावी, अशी शीतलच्या वडिलांची इच्छा होती. आणि त्यांनी ती इच्छा पूर्णही केली. 

शुक्रवारी (ता.1) सायंकाळी फुले, फुगे तथा सजावटीच्या साहित्यांनी सजविलेल्या आकर्षक बग्गीतून शीतलची वरात काढण्यात आली. बँडबाज्याच्या तालावर वऱ्हाडांनी मनसोक्त नाचत वरातीचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, शीतलने घोड्यावर बसण्याची हौसही पूर्ण केली. या आगळ्यावेगळ्या वरातीचा विषय सर्वांच्याच उत्सुकतेचा झाला होता.

शीतलचे आजोबा हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, तर वडील सिद्धार्थ सोनोने हे शासकीय सेवेत असून त्यांना दोन मुली आहेत. दुसरी मुलगीसुद्धा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT