Give reservation in contract recruitment Chhagan Bhujbal targeted BJP over census of OBC sakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : कंत्राटी पदभरतीतही आरक्षण द्या - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे नागपुरात शिबिर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कंत्राटी तत्त्वावर पदभरती होत आहे. या कंत्राटी पदभरतीतही आरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन महात्मा फुले सभागृहात करण्यात आले. याच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, हरी नरके उपस्थित होते. भुजबळ यांनी ओबीसींच्या जनगणनेवरून भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. जुन्या सरकारच्या काळात ते झाले.

परंतु, या मोदी सरकारने ते आकडे जाहीर केले नाही. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा फडणवीस सरकारच्या काळात एसीत बसून तयार करण्यात आला. त्यांच्या मते मुंबईत ओबीसीच नाही. एससी, एसटीप्रमाणेच ओबीसीला निधी मिळाला पाहिजे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ओडिशातील दुर्घटनेबद्दल रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.

मोदींना पलटी मारली ः हरी नरके

पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी ओबीसी जनगणनेच्या बाजूने होते. त्यांनी ठरावावर सही केली होती. मात्र आता त्यांनी पलटी मारली. ओबीसीच्या विकासासाठी जनगणना आवश्यक आहे, हे नियोजन आयोगानेसुद्धा सांगितले आहे. भाजपकडे ३१ टक्के ओबीसी मते आहेत आणि ते फक्त त्याचा वापर करतात, असे हरी नरके म्हणाले.

ओबीसींसाठी शिवसेना सोडली

त्याकाळात शिवसेना सोडणे सोपे नव्हते. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली. मी शिवसेना ओबीसीसाठी सोडली, असा खुलासा भुजबळ यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT