महाराष्ट्र

आमची सत्ता आणा, सगळं काही पूर्वपदावर आणू : अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

परभणी : शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शिक्षकांअभावी मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणार नाही. आश्रमशाळाही दुरावस्थेत आहेत. त्यामुळे आता परिस्थिती बदलायची असेल तर भगवान महादेवांसारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला घालवण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमची सत्ता आणा. सगळं काही पूर्वपदावर आणू, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'शिवस्वराज्य यात्रे'चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, जय शिवाजी, जय भवानी, असे आपण म्हणतो. याउलट हे सरकार 'टाक खंडणी' असे म्हणते. महाराजांच्या स्मारकाची एक वीट अजून यांना रचता आलेली नाही. तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकाचा पत्ता नाही. दृढ इच्छाशक्ती आणि धमक नसलेले महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, या सरकारने पोलिस भरती राबवली नाही. सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रात्रीत 3 खून होतात. स्व. आर आर पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली, असेही ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT