Nagpur Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Crime News : यू-ट्यूबवर बघून गर्भवतीने केली स्वतःची प्रसूती; बाळाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः नागपूरमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. एका अल्पवयीन गर्भवतीने चक्क यू-ट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती केली आहे. तिच्या बाळाचादेखील मृत्यू झालाय. बाळाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन कसून तपास सुरु केला आहे.

नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. एक-दोन महिन्यांच्या चॅटिंगनंतर एका दिवशी आरोपी तरुणाने तिला बाहेर बोलावलं आणि शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सदरील अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. परवा ३ मार्च रोजी रात्री तिची प्रसूती झाली.

हेही वाचाः तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सदरील अल्पवयीन गर्भवती मुलीने यू ट्यूबवर बघून स्वतःची प्रसूची केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने बाळाला जन्म दिला मात्र बाळाचा मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांना तरुणाविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोस्टमार्टमनंतरच बाळाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT