Sambhaji-Brigade
Sambhaji-Brigade 
महाराष्ट्र

गोव्यात संभाजी ब्रिगेडचा भाजपविरोधात शड्डू; लढवणार निवडणूक

सकाळ डिजिटल टीम

पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपच्या विरोधातील आघाडीसाठी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) शड्डू ठोकले असून तूर्तास दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष रेजिनाल्ड कॅमिलो डिकोस्टा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेड गोव्यात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबतीने राज्यात बदल घडवून आणण्यात पुढाकार घ्यावा. आपण आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली असून लवकरच राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे डिकोस्टा यांनी सांगितले. या पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढायचे ठरविल्यास संभाजी ब्रिगेड ४० जागांवर चांगले उमेदवार देण्यात पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले.

पुरुषोत्तम खेडेकर यांनी २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडची नोंदणी केली असून संघटनेचे २ लाख ५० हजार प्राथमिक सदस्य आहेत. डिकोस्टा हे संघटनेच्या गोवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत शिकलेल्या आणि प्रामाणिक उमेदवारांना संधी मिळण्याची आवश्यकता असून असे उमेदवार निवडून आल्यास त्यांच्यामार्फत सर्वसामान्य गोवेकरांना अपेक्षित असलेले प्रशासन देणे शक्य आहे, असे ते म्हणाले. मारिया डिकोस्टा या मांद्रे तर डायना डिकोस्टा या शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. सर्व शासकीय शाळांमध्ये गोमंतकीय वंशाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे पक्षाचे प्रमुख आश्वासन असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Marathi News Live Update: पुण्यात वाऱ्यासह हलक्या पावसाला सुरूवात

Space Tourist :  भारतीय वंशाचे गोपीचंद रचणार इतिहास, सायंकाळी सात वाजता आकाशात झेपावणार अंतराळयान

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का! अर्शदीपने उडवला ट्रेविस हेडचा त्रिफळा

SCROLL FOR NEXT