Ladki Bahin Yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ना तारण, ना जामीनदार द्यावा लागणार, तरी बॅंकेतून मिळणार २५ लाखांपर्यंत कर्ज, कोणती आहे योजना? वाचा...

सोलापूर शहर किंवा गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना बॅंकांकडून सुरवातीला दीड लाखांपर्यंत कर्ज मिळते. त्याची परफेड वेळेत झाल्यावर त्या गटाला तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते. त्यानंतर कर्जाची मर्यादा वाढते. तीन लाखांपर्यंत कर्ज वार्षिक सात टक्के व्याजदराने मिळते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर किंवा गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना बॅंकांकडून सुरवातीला दीड लाखांपर्यंत कर्ज मिळते. त्याची परफेड वेळेत झाल्यावर त्या गटाला तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते. त्यानंतर कर्जाची मर्यादा वाढते. तीन लाखांपर्यंत कर्ज वार्षिक सात टक्के व्याजदराने मिळते. त्यापुढील रकमेसाठी बॅंका नियमाप्रमाणे व्याजदर लावून कर्ज देतात. त्यासाठी कोणतेही तारण किंवा जामीनदार लागत नाही.

सोलापूर जिल्ह्यात २८ हजार बचत गट आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व उमेद अशा दोन्ही संस्था महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम करतात. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख महिला बचत गटांशी जोडल्या असून दरवर्षी त्यांना बॅंकांच्या माध्यमातून २७५ कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बचत गटांना २४५ कोटींचे कर्जवाटप झाले असून उद्दिष्टानुसार महिलांना ३१ मार्चपूर्वी आणखी २६ कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे.

या कर्जाचे हप्ते महिन्याला असतात आणि महिलांना सहजपणे भरता येईल हप्त्याची रक्कम असते. कर्जासाठी कोणताही जामीनदार किंवा तारण द्यावे लागत नाही. व्यवसायाचा कृती आराखडा बॅंकेत सादर करून त्या बचत गटाला ३ ते २५ लाखांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जातून महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून स्वावलंबी होणे अपेक्षित आहे.

लाखो महिला बनल्या स्वावलंबी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ‘उमेद’ अभियानाची घौडदौड सुरु आहे. २४ हजारांहून अधिक बचत गटांशी सध्या अडीच लाखांपर्यंत महिला जोडल्या आहेत. अनेक महिला छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत.

- सचिन चवरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, सोलापूर

नवीन बचत गट कसा स्थापन करायचा?

गावातील किमान दहा महिला एकत्रित येऊन बचत गट स्थापन करू शकतात. त्या महिलांनी गाव स्तरावरील समुदाय संसाधन व्यक्तीकडे त्यांची कागदपत्रे द्यायची असतात. त्यांच्या माध्यमातून बचत गटाची ऑनलाइन नोंदणी होते. त्याद्वारे बॅंकेत संयुक्त खाते उघडावे लागते. तो गट अधिकृत झाल्यावर त्याला ‘उमेद’कडून सुरवातीला ३० हजार रुपयांचा फिरता निधी मिळतो. तो परतफेड करायचा नसतो. त्यानंतर ६० हजार रुपये ‘उमेद’कडूनच वार्षिक ३ टक्के व्याजदराने दिले जातात.

जिल्ह्यातील बचत गटांची स्थिती

  • एकूण बचत गट

  • ३०,०००

  • संलग्नित महिला

  • ३ लाख

  • यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट

  • २७१ कोटी

  • तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर

  • ७ टक्के

  • कर्जाची मर्यादा

  • २५ लाखांपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली; Meesho शेअर्स 5% ने घसरले

Road Accident : घर चालवण्यासाठी दोन ठिकाणी काम करणाऱ्या सुभाषचा दुर्देवी शेवट, महामार्गावर बाजूला थांबलेल्या ट्रॉलीला धडकून मृत्यू

Latest Marathi News Live Update : प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत

Delhi BJP Leader Video : "हिंदी शिक नाही तर चालता हो"... भाजपच्या महिल्या नेत्याची अफ्रिकन फुटबॉलपटूला धमकी, व्हिडिओ व्हायरल

तुमची जागा आमच्या पायाजवळ! Vaibhav Suryavanshi च्या कृतीने पाकड्यांचा जळफळाट; मोहसिन नक्वी, सर्फराज अहमदची रडारड, ICC कडे तक्रार

SCROLL FOR NEXT