Monsoon Update sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून धडकला

मान्सून अंदमानात धडकला आहे अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शुक्रवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दोन दिवस अगोदरच दाखल झालेला मॉन्सून यंदा ४ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान-निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणतः २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा दोन दिवस अगोदरच मॉन्सून शुक्रवारी (ता. १९) अंदमानात दाखल झाला आहे. मॉन्सूनचे केरळमधील आगमन ४ जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या पावसावर 'एल निनो'चे सावट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, मॉन्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT