शेतकऱ्यांसाठी खुशखबर

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्या मिळणार प्रत्येक शेतकऱ्यास २००० रुपये; शेतकरी सन्मान निधी योजना, राज्य सरकारचाही २००० रुपयांचा हप्ता महिनाअखेर जमा होणार

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता बुधवारी (ता. १९) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत राज्यातील ९० लाख ४ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. याच महिनाअखेर राज्य सरकारकडूनही तेवढीच रक्कम मिळणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता बुधवारी (ता. १९) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत ९७ लाख शेतकऱ्यांपैकी ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ५६६ शेतकरी आहेत. तसेच याच महिनाअखेर राज्य सरकारकडूनही तेवढीच रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, असे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. त्याअंतर्गत राज्यातील ९७ लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यातील ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता मिळणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना केंद्राच्या हप्त्यानंतर नोव्हेंबरअखेर राज्याचाही दोन हजार रुपयांचा हिस्सा मिळणार आहे.

दरम्यान, आता एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, एकाच सात-बारा उताऱ्यावरील क्षेत्र पती-पत्नीच्या नावे असले, तरीदेखील त्यापैकी एकालाच म्हणजे त्या महिलेस सन्मान निधी मिळणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार ४०० शेतकऱ्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे.

अतिवृष्टीची भरपाई दुसऱ्या बॅंकेत; २० नोव्हेंबरपर्यंत करा ‘ई-केवायसी’

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी बॅंक पासबुक, सात-बारा उतारा तलाठ्यांकडे दिला. पण, अनेक शेतकऱ्यांची भरपाई दुसऱ्याच बॅंकेत जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही, त्यांनी गावातील आपले सरकार सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन चौकशी करावी. ज्यांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांना तेथेच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रावर आपली भरपाई आली की नाही, मंजूर किंवा वितरित झालेली रक्कम कोणत्या बॅंकेत जमा झाली, हे समजणार आहे. ज्यांना भरपाई वितरित झाली, पण खात्यात जमा झाली नाही, त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावीच लागणार आहे.

शेतकरी सन्मान निधीची स्थिती

  • नोंदणीकृत शेतकरी

  • ४,९९,९६६

  • आता लाभ मिळणारे शेतकरी

  • ४,९०,५६६

  • आता मिळणारा हप्ता

  • ९८,११,३२,०००

  • पडताळणीत घटलेले लाभार्थी

  • ९,४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Case : दिल्ली ब्लास्टच्या आधीचा आरोपी डॉ. उमरचा धक्कादायक व्हिडीओ समोर...आत्मघाती हल्ल्याबाबत काय म्हणाला होता?

लग्न होईना, चौघींनी बहिणीच्याच १६ दिवसांच्या लेकराला संपवलं; पाय मोडले, गळा दाबून पायाखाली चिरडलं, धक्कादायक व्हिडीओ समोर

Latest Marathi Breaking News : पुणे महानगरपालिकेत बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची, नोंदणी करण्याचे आदेश

Navale Bridge Accident: अपघातातील कंटेनर तपासणीत अडचणी; ब्रेक फेल की चालकाचे नियंत्रण सुटले? अहवालानंतरच स्पष्ट होणार

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT