st bus pass sakal
महाराष्ट्र बातम्या

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शालेय पास आता लांबपल्ल्याच्या बसमध्येही चालणार; सोलापूर जिल्ह्यातून हेल्पलाईनवर सर्वाधिक तक्रारी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करु शकणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हात करूनही गाडी न थांबल्यास विद्यार्थी १८००२२१२५१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करु शकणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हात करूनही गाडी न थांबल्यास विद्यार्थी १८००२२१२५१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतील. तक्रारीची खात्री करून संबंधित चालक, वाहक व आगारप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे.

परिवहन महामंडळाने १५ दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी खास हेल्पलाईन उपलब्ध करून दिली होती. त्यावर राज्यभरातून ३३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ५२ तक्रारी सोलापूर विभागातून प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये वेळेवर बस येत नाही, हात केला तर बस थांबत नाहीत, थांबा असूनही त्याठिकाणी बस थांबत नसल्याचे सांगितले जाते, अशा त्या तक्रारी आहेत. तसेच शालेय पास असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो, अशाही तक्रारी आहेत. या तक्रारींची गंभीर दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने लवकर कार्यवाही तथा सुधारणा करावी, अन्यथा शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परिहवन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री निर्माण व्हावी. परीक्षा असो किंवा शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाच्या गाड्यांना हात केल्यावर त्यांनी थांबणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांचे जेवढे नुकसान होईल, तेवढे दिवस संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बस येत नसल्याने शाळा सोडायला लागू नये, एवढीच आपली भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सर्वच एसटी गाड्या थांबायलाच हव्या

शालेय विद्यार्थ्यांसाठी साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटीमधूनही प्रवास करता येतो. अधिकृत थांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्यांनी हात केल्यावर चालकांनी गाडी थांबवावी, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.

- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: शेरवानी, फेटा अन् गॉगल… लूक बदलला, ताल जुळला! लेकाच्या लग्नात अजित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स व्हायरल, दादांचा लूक तर पाहा

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ कर्नाटकातून घेऊन जाणार का? माजी खासदार राजू शेट्टींचा सवाल, सतेज कृषी प्रदर्शनाला सुरुवात

Flight Ticket Hike: विमान प्रवासी आता आर्थिक कोंडीत; पुणे-दिल्लीचे तिकीट चौपन्न हजारांवर

"नियम सर्वांसाठी समान..."; खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये CJI Suryakant वकिलांवर संतापले, दिला सडेतोड संदेश

Kolhapur Tragic Incident : ११ हजार व्होल्टच्या तारेला हात लागला अन्, क्रिकेट खेळताना १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT