वंदे भारत रेल्वे esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी खुशखबर! जिल्ह्याला मिळणार आणखी एक ‘वंदे भारत’; नांदेड ते पुणे ५५० किमीचा प्रवास ७ तासांत; कुर्डुवाडी येथे असणार थांबा, वाचा...

पुणे- नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसला कुर्डुवाडी येथे थांबा मिळणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेससाठी सर्व्हे करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. पुणे- नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसला कुर्डुवाडी येथे थांबा मिळणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे.

सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे ५५० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा वेळ केवळ सात तासांवर येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे. सध्या पनवेल-नांदेड ही एकच गाडी आहे. ही गाडी रात्री ११ वाजता बार्शीला येते. वंदे भारतमुळे सोलापूरकरांनाही नांदेडला कमी वेळेत पोचण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे.

कुठे असणार थांबे?

नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर वंदे एक्स्प्रेसला थांबे असतील. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. यामुळे केवळ प्रवासाचा त्रास कमी होणार नाही, तर रोजगार, शिक्षण आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

अत्याधुनिक सुविधा

सेमी हाय-स्पीड ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. हाय-स्पीड वायफाय, वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार, आरामदायी रिक्लाइनिंग सीट्स, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, अधिक गती आणि कमी आवाजात प्रवास करण्याची संधी या गाडीमुळे मिळणार आहे.

नांदेडला जाण्यासाठी महत्त्वाची ठरेल रेल्वे

पुणे- नांदेड गाडीसाठी रेल्वे प्रशासनाचा सर्व्हे झाल्याचे समजले असून या कुर्डुवाडीला थांबा आहे. मात्र, बार्शीला थांबा नसल्याचे समजते. या गाडीला बार्शी येथेदेखील थांबा आवश्यक आहे. बार्शीला थांबा मिळाल्यास मराठवाड्यातील काही गावांसह बार्शी परिसरातील प्रवाशांना या गाडीचा फायदा होईल.

- शैलेश वखारिया, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेल, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयटी इंजिनिअरला १४ कोटींना लुबाडणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना अटक, दोघे फरार; मोठे अपडेट समोर

MS Dhoni : धोनी आयपीएलचा पुढचा हंगामही खेळणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं...

Winter Saree Style: थंडीला टाटा बाय-बाय! ऑफिससाठी साडीत स्टाइलिश राहण्यासाठी 'या' 5 खास टिप्स

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT