Gopichand padalkar Sakal
महाराष्ट्र बातम्या

पवार कुटुंबिय माझ्या हत्येच्या कटात; पडळकरांनी शेअर केला VIDEO

सकाळ डिजिटल टीम

रक्षकच भक्षक बनत असतील तर संरक्षण कशाला घ्यायचं असं म्हणत पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाराष्ट्र पोलिसांचा (Maharashtra Police) बॅाडीगार्ड नाकारला आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil), पवार कुटूंबिय आणि सांगली पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येच्या कटात हेच सामील होते असा आरोप पडळकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारताना पडळकर म्हणाले की, रक्षकच जर भक्षक बनत असतील तर यांच संरक्षण घ्यायचं कशाला?

पडळकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यात दिवसाढवळ्या पोलिस स्टेशनसमोरच या हल्ल्याचा सुनियोजीत कट कसा रचण्यात आला होता हे त्यांनी सांगितलं आहे. पडळकर म्हणाले की, हा जो व्हीडीओ आपण पाहिला दि. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झालेला आहे. आणि आपल्याला दिसलेही असेल की हल्ला किती सुनियोजीत होता.

माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडनं हमला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न असल्याचंही पडळकर म्हणाले.

पडळकरांनी या हल्ल्याच्या कटाचा गंभीर आरोप पोलिस अधीक्षकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला आहे. त्यांनी आरोप करताना म्हटलं की, हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला.

एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा चालूच ठेवील असंही पडळकर यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT