Politics
Politics esakal
महाराष्ट्र

मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली

सकाळ डिजिटल टीम

आघाडी सरकारनं खोटा आव आणत एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबत फक्त घोषणा केल्या.

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी राज्यातील आघाडी (Mahavikas aaghadi sarkar) सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. या घटनेनंतर आघाडी सरकारनं खोटा आव आणत एमपीएससीच्या (MPSC) विविध प्रश्नांबाबत फक्त घोषणा केल्या. विधानसभेमध्ये मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवार (Ajit pawar) आणि विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली अशी टीका भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

त्यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, चार महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावर (Lokseva Aayog) सदस्यांची नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. 2019 आली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासकाच्या आडमुठ्या धोरणामुळे अजूनही नियुक्ती पत्रासाठी झुराव लागत आहे. कोरोना काळात लांबलेल्या परीक्षांमुळं विद्यार्थ्यांचे वय वाढत गेलं त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढवण्याची फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र केली नाही. अंमलबजावणी न करता महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या आघाडी सरकारनं केलं आहे.

एमपीएससी ते आरोग्याच्या पदभरतीपर्यंत सरकारनं जो गोंधळ घातला आहे, त्यामुळे बहुजन विद्यर्थ्यांच्या प्रती या सरकारची नियत साफ नाही, हे स्पष्ट होताना दिसत आहे. त्यांच्या हेतुवर आता विद्यार्थीही शंका निर्माण करत आहेत. अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT