gopichand padalkar and jayant patil 
महाराष्ट्र बातम्या

'आघाडी सरकारची सत्ता गेल्याचं सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसतंय'

इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का?, पडळकरांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का?, पडळकरांचा सवाल

विधान परिषदेचा निकाल लागला आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे सुरतला गेले. काही दिवसांतच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तेव्हापासून जयंत पाटील यांचा चेहरा सुतक असल्यासारखा झालाय. आघाडी सरकारची सत्ता गेल्याचं सुतक पाटील यांच्या चेहऱ्यावर आजही दिसून येतंय, असा खोचक टोला भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. सांगलीतील वाळवा तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी जयंत पाटलांच्या मनात घालमेल सुरू आहे. इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का? असा सवाल पडळकरांनी उपस्थित असलेल्या जनतेला केला आहे. आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही अशी खरमरीक टीकाही पडळकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, सांगली जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झाला आहे. नोकर भरतीतही तिच परिस्थिती आहे. त्यामुळे बँकेवर प्रशासक लावायची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. शिंदे सरकारचा अजून विस्तार झालेला नाही मात्र आज ना उद्या या सरकारचा विस्तार होईल. हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघे भारी आहेत, असेही पडळकर म्हणाले.

जयंत पाटील सत्ता असेल तरच काम करू शकतात. सत्तेच्या विरोधात ते काम करू शकत नाहीत. जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायचा प्लॅन केला. 15 दिवसांपूर्वी पोलिसांवर दबाव टाकून एका अपघात प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप देखील पडळकरांनी केला आहे. माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे, पण आम्ही घाबरलो नाही तर रोज लढत राहिलो, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT