Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: "मित्रपक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे अपमान, मग..."; भाजप आमदाराचा खोचक प्रश्न!

Sandip Kapde

Maharashtra Politics: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकरांचे कान टोचले आहेत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नितेश राणे म्हणाले, मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान. मग महाविकास आघाडीमध्ये दादा असताना संजय राऊत ऊटसुट दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता?

गोपीचंद पडळकर आणि संजय राऊत यांना वेगळा न्याय का? संजय राऊत यांना मुक्त सहमती होती का ?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते पडळकर -

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र का लिहिले नाही, असे विचारले असता पडळकर यांनी अजित पवार हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू असून त्यांच्याशी संपर्क साधण्याची गरज नसल्याचे उत्तर दिले होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले , अजित पवारांच्या आमच्याबद्दलच्या भावना स्पष्ट नाहीत. त्यामुळे आम्हाला त्यांना पत्र देण्याची गरज नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. म्हणूनच मी त्यांना कधीही पत्र दिले नाही आणि मला वाटत नाही की आम्हाला आणखी पत्र देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT