gopichand padalkar
gopichand padalkar sakal media
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: ...तर आमदार, खासदार होता येतंच; पडळकरांचा एमपीएससी करणाऱ्यांना अजब सल्ला

सकाळ डिजिटल टीम

एमपीएससी नाही झाला तर आमदार आणि खासदार होता येतं, असा अजब सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच, एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळालं नाही म्हणून चिंता करू नका. असही पडळकर यावेळी म्हणाले. इतकेच नव्हे तर आमदार आणि खासदाराने कधी आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असा उलट सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे. (Gopichand Padalkar mpsc examination election mla mp maharashtra politics )

आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी अनेक अजब सल्ले दिले आहेत.

काय म्हणाले पडळकर?

तुम्ही एमपीएससी नाही झाला तर गावाकडं सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. एमपीएससी नाही झाला तर पंचायत समितीच्या सदस्यपदाची जागा वाट पाहत आहे. तुम्हाला सभापती होता येईल, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

एमपीएससी नाही झाला तर चिंता करू नका, झेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार होता येईल. इथे स्पर्धा मोठी आहे. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसं नाही. इथे 12 कोटीतून 288 आमदार विधानसभेत आहेत. ही किती मोठी स्पर्धा आहे. असं पडळकर यावेळी म्हणाले.

तसेच, निवडणुकीत पडला म्हणून माजी आमदाराने आत्महत्या केली असं कधी तुम्ही ऐकलंय? ऐकलं का तुम्ही? मंत्रीपदाच्या यादीत नाव आलं नाही म्हणून या या आमदाराने आत्महत्या केली असं ऐकलं का? मग त्यांना काय निराशा आली नसेल तर? असा सवालही त्यांनी उपस्थित केा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT