gopichand padalkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

'राम मंदिराला विरोध करणाऱ्यांकडून अहिल्यादेवींच्या स्मारकाचे लोकार्पण नाहीच'

'सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा कितीही गैरवापर केला तरी त्यांच्या नाकावर टिच्चुन काम करणार'

सकाळ डिजिटल टीम

'सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा कितीही गैरवापर केला तरी त्यांच्या नाकावर टिच्चुन काम करणार'

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावरुन काल सांगलीत काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गनिमी काव्याने स्मारक परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे त्यांनी 'ड्रोन' कॅमेऱ्याद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी करून लोकार्पण केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी कितीही सत्तेचा गैरवापर केला तरी आम्ही नेहमीच त्यांच्या नाकावर टिच्चुन काम करणार असल्याची बोचरी टीका केली आहे.

यासंदर्भात त्यांनी एक ट्विटरला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राम मंदिर निर्माण कार्याला विरोध करणाऱ्यांच्या हातून हिंदू संस्कृतीचा जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Ahilyadevi Holakar) मॉं साहेब यांच्या पवित्र स्मारकाला हात कधीही लागू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणालेत आमदार पडळकर

सर्वसामान्य मेंढपाळच्या हस्ते डिजिटल युगामध्ये ड्रोनच्या साहय्याने गुलाबाची फुलं अहिल्यादेवीच्या स्मारकावर पुष्पाअर्पण करुन हा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. जेव्हा लोकांची भावना असते, लोक जेव्हा एखाद्या विषयाच्या पाठी ठामपणे असतात तेव्हा पोलिसांनी किंवा कुणीही काहीही केलं तरी फरक पडत नाही. ज्यांचा हेतु स्वच्छ आणि स्पष्ट असतो तेव्हा यश मिळत राहत. लोकांची भावना होती की मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण व्हावं आणि ते झालं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी कितीही सत्तेचा गैरवापर केला तरी आम्ही नेहमीच त्यांच्या नाकावर टिच्चुन काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT