Thackeray Vs Shinde Maharashtra power struggle key questions before supreme court decision
Thackeray Vs Shinde Maharashtra power struggle key questions before supreme court decision  Esakal
महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; सिब्बल म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची असले. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रश्नांचा भडीमार केला आहे.

दरम्यान, आजच्या सुनावणीच्या दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आधी सदस्यांच्या अपात्रेबाबत निर्णय व्हावा, असे सिब्बल यांनी म्हटले. त्यांनी यावेळी राज्यपालांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय आणि इतर घटकांवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

पहाटेच्या शपथविधी वेळी राज्यपालांनी कोणाचातरी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला. राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदारीच्या पलीकडे काम केले आहे. देशाच्या राजकारणामध्ये राज्यपालांचा सक्रिय हस्तक्षेप आहे, हे दुर्दैवी असल्याचे मत असल्याचे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या दरम्यान व्यक्त केलं आहे.

बहुमत आहे की नाही हे माहीत नसताना राज्यपाल एखाद्याला शपथ कशी घेऊ देऊ शकतात? असा सवालही सिब्बल यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर आता शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करत आहेत. या सर्व युक्तीवादावर कोर्ट काय निकाल देणार किंवा काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना टनेता ठरवण्याचा अधिकार पक्षाला आहे की आमदारांना, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. लोकशाही परंपरेनुसार आमदारांच्या संविधानात राजकीय पक्ष, असं नमुद केलेलं नाही. राज्यपालांच्या अधिकारात कोर्ट हस्तक्षेप करू शकतो का. दुसऱ्या राज्यात बसून शिंदे मुख्य नेते कसे बनले. व्हीप कायद्यानुसार बदलला जाऊ शकतो.

कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्षाचा इतिहास न्यायालयात वाचून दाखवला. सिब्बल यांनी तथ्याच्या आधारे युक्तिवाद केला. पक्षांतर बंदीच्या कायद्यात बदल आवश्यक असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले.

शिंदे गटाने पक्षाची बैठक जाणीवपूर्वक टाळली होती. शिंदेगट बैठकीला हजर राहणे म्हणजे घोडेबाजार झाला, असे सिब्बल म्हणाले. शिंदेंनी दुसऱ्या राज्याची मदत घेतली. शिंदे गटाचे आमदार सुरूवातील गुजरात नंतर आसामला गेले. दुसऱ्या राज्यात बसून शिंदे मुख्य नेते कसे बनले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT