Governor Bhagat Singh Koshyari says if Sanskrit sloka teach to students the it will be help in release rape cases 
महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल म्हणतात, 'बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा'

वृत्तसंस्था

नागपूर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूकांमध्ये सर्वात जास्त जे नाव चर्चेत होतं, ते म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोशियारी. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे. बलात्कार रोखण्यासाठी काय करायला हवे, यावर त्यांनी एक अजब उपाय सुचवला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल कोशियारी नागपूरात आले होते. या कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना त्यांनी महिला अत्याचार कसा थांबवता येईल यावरील उपाय सुचवला. महिलांवरील अत्याचार थांबवायचे असल्यास विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवले पाहिजेत, तर या घटना कमी होतील. घरात मुलींचे कन्यापूजन करतात आणि देशात काय घडतंय. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केला. 

या कार्यक्रमात कोशियारी यांनी इतर अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. चांगल्या वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा गैरवापर, सत्ताकारण, अर्थकारण अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. पण संस्कृत श्लोक शिकवल्याने अत्याचाराच्या घटना कमी होतील या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चा होत आहे. तसेच असे केले असते तर आतापर्यंत घडलेल्या कित्येक घटना घडल्याच नसत्या अशा प्रतिक्रिया येत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Ganesh Kale Case: Vanraj Andekarचा बदला Ayush Komkar नंतर गणेशला संपवला, टोळीयुद्ध पेटलं.. | Sakal News

Solapur Politics: 'भाजप माेहिते-पाटील यांना बालेकिल्ल्यातच घेरणार'; कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांचा पत्नीसह शुक्रवारी पक्षप्रवेश..

SCROLL FOR NEXT