Governor Koshyari 
महाराष्ट्र बातम्या

आईने खूप करुणा दिली, त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही - राज्यपाल

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात आपलं बोलणं आटोपलं. त्यांनी या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते राजभवनात नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात आपलं बोलणं आटोपलं. त्यांनी या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं की, 'राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर लोकांसाठी असावं.'

राज्यपाल यांनी राजभवनाच्या परिसराचं वैशिष्ठ्य सांगताना म्हटलं की, मलबार हिल तिन्ही बाजूनंनी समुद्र आहे. अनेक वर्षांपासून बाण गंगा देखील वास करते. सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची यावर कृपा आहे. मी अडीच वर्षांपासून इथे आहेत आणि राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर लोकांसाठी असावं. विशेष करून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला असेही ते म्हणाले.

कोरोनानंतर 5-6 महिन्यांनंतर माझ्याकडे लोकांनी येऊन काही अधिकाऱ्यांचे कौतुक केलं आणि त्यांचा गौरव करण्यास सांगितलं. जवळ जवळ 5000 लोकांचा मी गौरव केला. माझ्या आईने मला खूप करुणा दिली त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही असेही राज्यपालांनी त्यांच्या भाषणावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT