bhagatsingh koshyari CM uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल तर त्याला जेलमध्ये पाठवा - उद्धव ठाकरे

राज्यपालांचं हे वक्तव्य अनावधानाने झालेलं नाही, असंही ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं असून त्यावरुन गदारोळ निर्माण झाला आहे. याच विषयी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. (Shivsena Uddhav Thackeray on Governor Bhagatsingh Koshyari statement)

राज्यपालांचं हे विधान अनावधानाने केलेलं नाही, असंही उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, किती काळ केवळ त्या खुर्चीत बसलाय म्हणून एखाद्या व्यक्तीचा आदर ठेवायचा. गेल्या दोन अडीच वर्षांपासून जी व्यक्ती राज्यपाल पदाच्या खुर्चीत बसलीये. मला त्या पदाचा अवमान करायचा नाहीये. पण एक गोष्ट खरी आहे की त्या खुर्चीचा मान, खुर्चीत बसलेल्याने राखायचा असतो. तो भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी ठेवलेला नाही. गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची वक्तव्य पाहून महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात, असा प्रश्न मला पडलाय. मी मुख्यमंत्री असतानाही जेव्हा लोकांचे जीव जात होते लॉकडाऊनमध्ये तेव्हा त्यांना प्रार्थनास्थळं उघडायची घाई झाली होती.

राज्यपाल कोश्यारी यांना कोणीतरी कोल्हापूरचा जोडा दाखवायची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे म्हणाले, " मधे सावित्रीबाई फुलेंबद्दलही बिभत्स उद्गार त्यांनी काढले. आता महाराष्ट्रात तीन वर्षे राहतायत, सगळं वरपलंय, मान मरातब ओरबाडलेला आहे आणि आता महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करतायत. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे आहे कोश्यारींनी महाराष्ट्रात "महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा" असं म्हणायची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वहाणा दाखवणं गरजेचं आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवावे लागेल.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. शपथ घेतांना जाती पाती एकत्र ठेवायची शपथ ते घेतात.पण या राज्यपालांनी हिंदूंमध्ये फुट जाती पाती धर्मावरुन आग लावण्याचं काम सुरू केलंय. दिल्लीचं हे पार्सल जर राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल तर त्याला जेलमध्ये पाठवावं लागेल. गुण्यागोविदानं नांदणारे लोक इथं आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचं काम सुरू आहे. गेली तीन वर्षे ज्या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं, त्याच्याशीच नमक हरामी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT