YATIN AND KARAN SHAHA
YATIN AND KARAN SHAHA SAKAL
महाराष्ट्र

भारतीय उद्योगवाढीला जगात मोठी संधी! उद्योजक यतिन शहा व करण शहांचा विश्वास

तात्या लांडगे

सोलापूर : चीनने आपल्या सीमा बंद करुन टाकल्याने तेथील निर्यात ठप्प आहे. यामुळे पर्यायाने भारतात व जगातील अनेक देशांमध्ये भारतीय उद्योगवाढीला मोठा वाव आहे. एकीकडे मोठा खरेदीदार देश म्हणून परदेशातील उद्योजक भारताकडे आशेने पाहात आहेत. तर येथील निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय उद्योजक व प्रिसीजन कॅमशाफ्टचे अध्यक्ष यतिन शहा यांनी व्यक्त केला.

श्री. शहा यांनी ‘सकाळ' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या बंगाल, बिहार अशा राज्यांमध्ये मोठमोठे उद्योग सुरू होत आहेत. यातून मोठी रोजगार निर्मिती होत आहे. मध्यंतरी रशिया-युक्रेन युद्धाचा भडका मोठा होता. आता तो निवळू लागला आहे. भारतासह बहुतेक देशांमधील उद्योगांसाठी विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगांना रशिया व युक्रेनमधून कच्च्यामालाचा पुरवठा होतो. पण, त्या दोन्ही देशांतील युद्धामुळे अनेक उद्योगांसमोरील अडचणीत वाढ झाली. युद्धापूर्वी उद्योजकांना माल वाहतुकीसाठी जहाज मिळत नव्हते. तेवढ्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले आणि उद्योजकांसमोरील अडचणीत भर पडली. तरीपण, मागील काही दिवसांत हे उद्योग आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यांनी अन्य देशांचा पर्याय शोधल्याचेही सांगितले.

इंधन दर वाढणार

रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील इंधन दरात मोठी वाढ झाली. आपल्याकडे पेट्रोलचा दर शंभराहून अधिक तर युरोपात तो प्रतिलिटर दोनशेवर गेला आहे. युद्धामुळे ऑटोमोबाईल उद्योगावर मोठा परिणाम झाला. आपण सध्या रशियातून क्रूड ऑईल आयात करत आहोत. पण, युद्धाची स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास क्रूड ऑईलचा दर गगनाला भिडणार हे निश्‍चित! त्यामुळे इंधनाच्या किमती पुन्हा वाढतील, असा अंदाज यतीन शहा यांनी व्यक्त केला.

भारत मातब्बर देशांच्या पंगतीत

जागतिक स्तरावर भारताने चांगली कामगिरी केली आहे. जगातील अनेक देशातील उद्योजक भारताकडे मोठा खरेदीदार व निर्यातदार देश म्हणून पाहत आहेत. चीन हा सद्यस्थितीत व्यापारी दृष्टीकोनातून अनेक देशांपासून अलिप्त राहिला आहे. त्यामुळे भारतात उद्योजकांना गुंतवणूक करण्याची संधी वाटू लागली आहे. जगातील अनेक प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत भारताची गणना होऊ लागल्याचेही शहा यांनी सांगितले.

प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीचा प्रयत्न

सोलापूर : एलसीव्ही (छोटा हत्ती, घंटागाड्या वगैरे) तीन टन क्षमतेच्या गाड्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते. भारतात तशा जवळपास २० लाख गाड्या आहेत. त्या गाड्या इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न ‘प्रिसिजन’कडून सुरू आहे. नेदरलँड येथे त्या गाड्यांचे मॉड्यूल तयार केले जात असल्याची माहिती ‘प्रिसिजन’चे कार्यकारी संचालक करण शहा यांनी दिली. सोलापुरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेच्या जवळपास २५० घंटागाड्या आहेत. प्रदूषणवाढ होण्यात अशा गाड्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. या सर्व गाड्या इलेक्ट्रिक झाल्या तर १८ हजार झाडे लावल्यावर जेवढे प्रदूषण कमी होईल, तेवढी पर्यावरणाची बचत होईल, असा विश्वास श्री. शहा यांनी व्यक्त केला. विशेष बाब म्हणजे, घंटागाड्या इलेक्ट्रिक झाल्यास दरवर्षी महापालिकेची १० ते १२ कोटींची बचत होऊ शकते, असेही ते म्हणाले. लगेचच सर्वकाही इलेक्ट्रिक होणार नाही, पण त्याची खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. तीन टनापर्यंत माल वाहतूक करणारी छोटी वाहने सर्वाधिक प्रदूषण करतात. दुसरीकडे, मोठ्या मालवाहतूक वाहनांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करण्यासाठी खूप इंधन लागते. त्यावर आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय आहे, जेणेकरून इंधनावरील अवलंबत्व आणि पर्यावरण ऱ्हास थांबविणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, बाहेरील उद्योजकांना आपल्याकडे येण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी राजकीय रेटादेखील खूप महत्त्वाची बाब आहे. सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केल्यास निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात मोठमोठे उद्योग येतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT