satej patil, Sanjay Mandlik Esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे काम करेल- सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील - शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठतीत निर्धार

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: भापजला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकसंघपणे काम करतील, ते कोठेही कमी पडणार नाहीत, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज व्यक्त केला. शिवसैनिकांसोबत झालेल्या बैठकीतनंतर ते माध्यमांशी बोलत होते. काल राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरासागर (Rajesh Kshirsagar)यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्याला गैरहजरी दाखवून नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पालकमंत्री पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेवून त्यांना विश्‍वासात घेतले. निवडणुकीचे नियोजन, व्युहरचनेबाबत बैठकीच चर्चा झाली. यावेळी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), जिल्हाप्रमुख विजय देवणे (Vijay Devane) यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, निश्‍चितपणे शिवसेनेची काही नाराजी होती. राजेश क्षीरसागर यांनी मेळावा घेवून ती जाहीर केली. मात्र आम्हाला खात्री आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ती नाराजी दूर होईल. आणि एकसंघपणे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काम करतील.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ती नाराजी दूर होईल. आणि एकसंघपणे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काम करतील.

भाजपला रोखण्यासाठी ते कोठेही कमी पडणार नाहीत, याचा विश्‍वास निश्‍चितच आम्हाला आहे. ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असणार आहे. एका बाजूला सत्य महाविकास आघाडीचे आणि एका बाजूला भाजपचे खोटं अशा संघर्षाची ही लढाई असणार आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोविड असेल, महापूर असेल सर्व ठिकाणी सरकारने केलेले काम असेल, पन्नास हजार रुपयांची कर्ज माफी असेल त्याच जोरावर आम्ही निवडणूक निश्‍चितपणे जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील आणि शहरातील शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. येथे शिवसेनेचा अजेंडा पाळण्यावर चर्चा झाली. ज्यामध्ये शिवसेनेत जो आदेश मातोश्रीवरून येतो तो तंतोतंत पाळला जातो. तशी प्रथा शिवसेनेत आहे. खदखद वगैरे जी होती ती उमेदवारी पर्यंत ठिक होती. आता खदखदीपलीकडे जावून निवडणुकीचे नियोजन आणि त्या संदर्भात काय करावे लागेल. याची नेमकी व्युहरचना काय आहे याची चर्चा बैठकीत झाली. ताकदीने प्रचार करणे आणि भाजपला रोखणे हा आमच्या सर्वांचा अजेंड आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढायचे हा ठाम निर्धार आजच्या बैठकीत घेतला आहे.

बैठकीस शहर प्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, शुभांगी पोवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT