Gudhi Padwa swagat yatra
Gudhi Padwa swagat yatra sakal media
महाराष्ट्र

'आता मिरवणुका जोरात काढा'; महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध गुढीपाडव्यापासून हटणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आले नाहीत. येत्या २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2022) मुहुर्तावर हे निर्बंध उठवण्यात येतील, अशी चर्चा होत होती. अखेर याबाबतचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र येत्या गुढीपाडव्यापासून कोरोनाच्या निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.

याबाबतची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. सगळ्याच मंत्र्यांची अशी इच्छा होती की, राज्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावेत. त्यानुसारच आज मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निर्बंध मुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT