Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी मंजूर केलेल्या फायली एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीसही तपासणार?

अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं तरी आता मविआच्या काळासारखं होणार नसल्याचं शिवसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या विरोधानंतरही अखेर राज्याचं अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच गेलं आहे. अजितदादांकडे अर्थमंत्रीपद गेल्याने शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरमसाठ निधी दिला होता. त्याचप्रमाणे या सरकारमध्ये गोष्टी घडू नये, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. त्यामुळेच शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान आता अजित पवार शिंदे गटाला निधी देणार का? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अर्थ खातं अजित पवारांकडे असलं तरी देखील मविआ सरकार सारखी पुनरावृत्ती होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेखालून जाणार आहेत. त्यामुळे मविआच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते. ते या काळात होणार नाही. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

अजित पवार यांच्या फायली फक्त मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नजरेखालून जाणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. म्हणजे अजित पवार यांनी मंजूर केलेली फाईल शिंदे फडणवीस यांच्या नजरेखालून जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिवसेनेला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT