महाराष्ट्र बातम्या

Sadavarte Vs Jarange: जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका; 'या' दिवशी होणार सुनावणी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. यासाठी त्यांनी राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे. पण आता जरांगेंच्या या आवाहानाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. सदावर्तेंच्या या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. (gunaratna sadavarte plea in mumbai hc against manoj jarange agitation in mumbai hearing will be held on January 22)

मनोज जरांगेंनी मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणांचं हत्यार जरांगेंनी उपसलं आहे. पण यासाठी ३ कोटी मराठा समाजानंही मुंबईत दाखल व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यासाठीची नियोजन आणि तयारी देखील सुरु झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

पण इतक्या मोठ्या संख्येनं जर लोक मुंबईत आले तर मुंबईकरांची मोठी गैरसोय होईल, त्यामुळं जरांगे आपल्या आवाहनाद्वारे सरकारला वेठीस धरत असल्याचं सांगत, त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर आता २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी जरांगेंच्या आंदोलनास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्यावतीनं मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. पण या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला होता. त्यानंतर आता सदावर्तेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT