Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunratna Sadavarte: ''हे भाजपचं पिल्लू आहे, त्याला महाराष्ट्र तोडायचाय...'' शाई फेकणाराची प्रतिक्रिया

संतोष कानडे

सोलापूरः Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर शाई फेकली आणि निषेध नोंदवला.

गुणरत्न सदावर्ते हे काल उस्मानाबादमध्ये होते. स्वंतत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी तिथे परिषदेचं आयोजन केलं होतं. याला विरोध करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.

हेही वाचाः मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आज गुणरत्न सदावर्ते हे सोलापूरमध्ये आहेत. तिथे त्यांचा जाहीर कार्यक्रमदेखील होतोय. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांना शाई फेकली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या.

सोमनाथ राऊत बोलतांना म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हे भाजपचं पिल्लू आहे. या पिल्लाला महाराष्ट्रात फिरु देणार नाही. भाजपला महाराष्ट्र तोडायचा आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही, कारण संभाजी ब्रिगेड ही चळवळ जिवंत असल्याचं राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि महाराष्ट्र तोडण्याची भाषा, यामुळे सदावर्ते यांना ठिकठिकाणी विरोध होतांना दिसत आहे. या घटनेनंतर सदावर्ते यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांना लक्ष्य केलं. शिवाय संजय राऊत यांनी सीमा प्रश्नामध्ये लक्ष घालू नये आणि नक्षली भाषा करु नये, असं आवाहन सदावर्ते यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT