gunratna sadavarte on ST Employee Suicide blame sharad pawar and bank politics for salary delay shinde bjp govt  
महाराष्ट्र बातम्या

ST Employee Suicide : पगार थकल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; सदावर्तेंचं शरद पवारांकडे बोट, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

ST Employee Suicide : एसटी कर्मचाऱ्याचे पगार थकल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने पगार मिळत नसल्याच्या विवंचनेतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामागे बँकांचे राजकारण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ठेवणीतले काही आधिकारी असल्याचा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

मागच्या महिन्याच्या पगारावेळी एसटी महामंडळातील फायनान्स डिपार्टमेंटचे सचिव आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी मागच्या वेळी एका कर्मचाऱ्याला पगार वेळेवर होत नाही या विवंचनेतून हृदय विकाराचा झटका आल्याचे दाखवून देण्यात आलं. त्यांना आम्ही त्यांना पगार करण्यात काय अडचण आहे हे विचारलं होतं असे सगावर्ते म्हणाले.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येबद्दल बोलतना सदावर्ते म्हणाले की, मायबाप असलेलं सरकार म्हणजे श्रद्धेय देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिकाऱ्यांना काय शिक्षा देणार हे जाहीर केलं पाहीजे. कारण सरकारला बदनाम करण्यासाठी हे अधीकारी कारणीभूत होत असतील तर हे वेदणादायी आहे. या अधिकाऱ्यांना सहा महिने तुरूंगात का पाठवले जाऊ नये याबद्दल कंटेम्ट आम्ही मूव्ह करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सदावर्ते साम टीव्हीशी बोलत होते.

दरम्यान सरकारनेच निधी दिला नाही तर अधिकारी पगाराचे वाटप कसे करतील? असा प्रश्न सदावर्तेंना विचारण्यात आला. यावर बोलतना सदावर्ते म्हणाले की, सरकार ही पगार वाटप करणारी व्यवस्था नाहीये. सरकारचा वकिल किंवा शरद पवारांच्या काळातील दलालासारखं मला बोलता येत नाही.

पगार थकले यामागं शरद पवार?

येणाऱ्या आगामी वर्षाच्या बजेट तरतुदीच्या संदर्भात बैठक होऊन येणाऱ्या वर्षातील पगाराची आर्थीक तरतूद केल्याचे महामंडळाच्या एमडी शेखर चन्ने यांनी मला सांगितलं असल्याचे सदावर्ते म्हणाले.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रस्तूत पगाराच्या बाबतीत जाणूनबुजून बँकेचं राजकरण आणि शरद पवार यांच्या ठेवणीतल काही अधीकारी आहेत. त्याच्यापैकी एसटी महामंडळातील फायनान्स डिपार्टमेंटचे सचिवही आहेत असेही सदावर्ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT