H3N2 Virus esakal
महाराष्ट्र बातम्या

H3N2 Virus : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

या विषाणूमुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. यामध्ये मास्कसक्ती विषयीचाही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यातच नव्हे, तर देशभरात H3N2 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे ५३ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मास्कसक्तीबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आपण राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, अशी माहितीही सावंत यांनी दिली आहे. तसंच आजार अंगावर काढू नका, खबरदारी घ्या, मास्क वापरा, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट 2026 फेरपरीक्षेसाठी मिळणार अतिरिक्त वेळ, अ‍ॅडमिट कार्ड १४ जूनपर्यंत; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Google Storage Policy 2026 : गुगलचा मोठा निर्णय! 15GB फ्री स्टोरेजचा नियम बदलला; आता मिळणार 'एवढं' स्टोरेज

Garbhaling Nidans Pune Racket: गर्भलिंग निदान रॅकेटवर मोठी कारवाई; ‘पुणे कनेक्शन’ उघड, ३ डॉक्टरांसह एजंट अटकेत, साखळीतील मास्टरमाईंड कोण?

Maharashtra Legal Reform: राज्यात मोठा कायदेशीर बदल; दिवाणी व जिल्हा न्यायालयांचे ट्रस्ट निर्णय अधिकार संपुष्टात, राज्य सरकारची अधिसूचना!

Maharashtra Education Update: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ई-मेल, व्हॉटस्‌ॲपवर स्वीकारणार प्रस्ताव, इंधन बचतीलाही हातभार..

SCROLL FOR NEXT