Gulabrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil: ...तर राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली असती; गुलाबराव स्पष्टच बोलले

संतोष कानडे

मुंबईः मंत्री गुलाबराव पाटील आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. आम्ही पुढे होऊन सत्तास्थापन केली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावून शपथ घेतली असती, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातली राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. 'शिवसेना' या पक्षावर शिंदे गटाने हक्क सांगायला सुरुवात केलीय. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे. येत्या काही दिवसांमध्ये 'खरी शिवसेना' कुणाची हे स्पष्ट होईलच. परंतु ठाकरे आणि शिंदे गटातील नेते कायम एकमेकांवर खालच्या स्तरावर टीकस्र करतांना दिसून येत आहेत.

राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केले आहे. ते म्हणाले की, ''आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली असती. नाहीतरी यापूर्वीदेखील पहाटेचा शपथविधी झालेलाच आहे.'' असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीला चिमटे काढले आहेत.

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे मंत्री गुलबराव पाटील यांच्यातही मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यानंतर पक्ष बुडवणार अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ही सध्या जळगाव येथे आहे, दरम्यान, जळगावमध्ये अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Latest Maharashtra News Updates: मनोज जरांगे पाटील यांची दिली नांदणी मठाला भेट

SCROLL FOR NEXT