hailstorm google
महाराष्ट्र बातम्या

पुढील काही तास राज्यातील 'या' भागांत गारपीटासह जोरदार पाऊस

राज्यातील या भागांत तीव्र गडगडासह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील या भागांत तीव्र गडगडासह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊसाच्या सरी बरसत आहेत. यामध्ये काही प्रदेशात गारपीटसह पावसाने जोरदार एंट्रीही केली आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही भागांत गारपीटसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 3 ते 4 तासांत राज्यातील काही ठिकाणी गारपिटीसह तीव्र पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह गोवा आणि उत्तर कर्नाटकातील काही प्रदेशाचा समावेश असणार आहे. येथील भागांत तीव्र वीजा आणि गडगडासह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांना वेग आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील काही तास गारांसह पाऊस पडणार आहे. राज्यातील सागंली, कोल्हापूरसह गोवा आणि कर्नाटकातील काही भागांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना हवामान खात्यातकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या वादळी प्रणालीमुळे ढगांची दाटी झाली आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहत आहे. पुढील काही तास या भागत पाऊस होणार असल्याने घाबरुन न जाता कारण नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT