Hambirrav Mohite  google
महाराष्ट्र बातम्या

Hambirrav Mohite : सोयराबाईंचे भाऊ असूनही हंबीररावांनी संभाजी महाराजांना साथ का दिली ?

हंबीरराव हे भावनेच्या आहारी कधीच जात नसत. ते प्रसंग पाहून लढत आणि निर्णय घेत. त्यामुळे शत्रूच्या सैन्यात त्यांची दहशत होती.

नमिता धुरी

मुंबई : वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं आपल्याला माहितीच आहे. या गाण्यात वर्णन करण्यात आलेल्या प्रसंगात प्रतापराव गुजर हे शिवाजी महाराजांचे सेनापती मृत्युमुखी पडले.

प्रतापरावांनंतर महाराजांना सेनापतीची गरज होती. शे-दीडशे सैनिकांची तुकडी सांभाळणाऱ्या जुमला या पदावर हंसाजी मोहिते काम करत होते. ते अतिशय निष्ठावान होते. त्यांना महाराजांनी सेनापती म्हणून नेमले.

आजच्याच दिवशी म्हणजे ८ एप्रिल रोजी त्यांना महाराजांनी हंबीरराव हा किताब दिला. हंबीरराव हे महाराजांची पत्नी सोयराबाई यांचे बंधू होते. सोयराबाई शिवाजी महाराजांवर नाराज असल्याच्या व संभाजी महाराजांविरोधात कारवाया करत असल्याच्या कहाण्या आपण वाचल्या आहेत. (Hambirrav Mohite: Why did Hambirrao support Sambhaji Maharaj despite being Soyrabai's brother?)

असे असूनही हंबीररावांनी मात्र शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली व त्यानंतर स्वराज्य अखंड राखण्यासाठी ते संभाजी महाराजांसोबत राहिले. हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर हंबीरराव यांच्याकडे सरनौबत पदाची जबाबदारी देण्यात आली. मुघल साम्राज्याविरोधात महाराजांनी उघडलेल्या मोहिमेत ते सोबत होते.

स्वराज्याच्या खजिन्यात भर व्हावी म्हणून हंबीररावांनी दौलताबाद, वाई, लासूर येथील बाजारपेठा लुटल्या. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनीही स्वराज्याच्या तिजोरीत भर टाकण्यासाठी बुऱ्हाणपूर लुटण्याचे ठरवले. यात सरसेनापती हंबीररावांकडे नेतृत्व देण्यात आले होते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जी ९ वर्षे संभाजींनी मुघलांशी संघर्ष केला त्यातील ७ वर्षे हंबीरराव त्यांच्या सोबत होते. त्यानंतर औरंगजेबाला नामोहरम करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हंबीरराव हे भावनेच्या आहारी कधीच जात नसत. ते प्रसंग पाहून लढत आणि निर्णय घेत. त्यामुळे शत्रूच्या सैन्यात त्यांची दहशत होती.

सोयराबाईंचा मुलगा राजाराम हा हंबीररावांचा भाचा होता. संभाजींऐवजी आपल्या मुलाला राज्याभिषेक व्हावा अशी सोयराबाईची इच्छा होती. त्यामुळे ती संभाजी महाराजांविरोधात कारवाया करत असे.

हंबीररावांना मात्र स्वराज्यात दुही नको होती. त्यामुळे आपल्या भाच्याला पाठिंबा न देता ते संभाजी महाराजांच्या पाठिशी उभे राहिले. शेवटपर्यंत त्यांनी निष्ठेने सेवा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT