solapur alchol sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीचा महापूर! हातभट्टीच्या कारवाईवरून एक्साईज व पोलिसांचे एकमेकांकडे बोट; दोन्ही यंत्रणांचे ऑपरेशन परिवर्तन, हातभट्टीमुक्त गाव कागदावरच

सोलापूर जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये (ठिकाणे) पिढ्यान्‌पिढ्या अवैध हातभट्टीचा व्यवसाय करणारे आहेत. त्यात तरुण मुले, महिला गुंतल्या आहेत. त्यांना या अवैध व्यवसायातून बाहेर काढून जिल्ह्यातील कौटुंबिक वाद, छोटी-मोठी भांडणे कमी व्हावीत हा उद्देश ‘ऑपरेशन परिवर्तन’चा आहे. पण, हातभट्टीमुक्त जिल्ह्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे त्यासाठी वेळ नाही हे विशेष.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : गावातील भांडणांचे मूळ, कौटुंबिक कारणांमागील प्रमुख कारण दारू असल्याने जिल्ह्यातील अवैध हातभट्टी बंद व्हावी, म्हणून सप्टेंबर २०१९ पासून ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेतले. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान सुरू केले. मात्र, अवैध हातभट्ट्यांवर आणि गावागावातील विक्रेत्यांवर कारवाई करायची कोणी, याबाबतीत पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हातभट्टीचा महापूर आला असून गावागावात खुलेआम अवैध हातभट्टीची विक्री सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये (ठिकाणे) पिढ्यान्‌पिढ्या अवैध हातभट्टीचा व्यवसाय करणारे आहेत. त्यात तरुण मुले, महिला गुंतल्या आहेत. त्यांना या अवैध व्यवसायातून बाहेर काढून जिल्ह्यातील कौटुंबिक वाद, छोटी-मोठी भांडणे कमी व्हावीत हा उद्देश ‘ऑपरेशन परिवर्तन’चा आहे. पण, हातभट्टीमुक्त जिल्ह्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे त्यासाठी वेळ नाही हे विशेष.

दुसरीकडे ग्रामीण पोलिसांनी पूर्वीच्या अधिकाऱ्याच्या अभियानाला बगल देऊन विकसित अभियान गाव, ऑपरेशन पहाट, सेंद्रिय शेती अभियान नव्याने सुरू केले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टीऐवजी देशी-विदेशी दारू वाहतूक, परमीट रूम, बिअरबार अशा बाबींकडेच अधिक लक्ष आहे. दोन्ही यंत्रणेला हातभट्टीवरील कारवाईसाठी वेळ नसल्याने बंद होण्याच्या मार्गावरील हातभट्ट्या (तळे हिप्परगा, मुळेगाव तांडा, कोंडी, दोड्डी अशा १७ ते १९ ठिकाणी) आता दिवसरात्र सुरू आहेत. शेकडो तरुणांना विषारी हातभट्टीच्या सेवनामुळे जीव गमवावा लागला आहे.

कारवाईत हातभट्टी अन्‌ रसायन सापडतेच, तरीही...

ग्रामीण पोलिस असो की राज्य उत्पादन शुल्क विभाग, या यंत्रणेच्या पथकाने कधीही छापा टाकला, तेव्हा हजारो लिटर गूळमिश्रित रसायन सापडतेच. शेकडो लिटर हातभट्टी देखील आढळते. विनानंबरप्लेटच्या वाहनातून मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास अवैध हातभट्टी गावागावात पोच केली जाते. त्या हातभट्टीने अनेकांचे संसार मोडले तर अनेकांचा संसार उद्धवस्त केला आहे, तरीदेखील शासकीय यंत्रेणाला हातभट्टी बंद करता आलेली नाही ही महिलांची खंत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टीची स्थिती

  • हातभट्टीची ठिकाणे

  • ५४

  • सर्वाधिक हातभट्टी विक्रीची गावे

  • २९०

  • दरवर्षी नष्ट केलेली हातभट्टी

  • ७८ ते ९० कोटी

  • दरमहा हातभट्ट्यांवर छापे

  • १ किंवा २

  • हातभट्टीमुक्त गावे

  • ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : 'नुकतेच स्थापन झालेल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत'- उद्योगपती रॉबर्ट वड्रा

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT