solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यात वाढली हातभट्टीची नशा; कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा तरूण हातभट्टीच्या आहारी; मुलीने अर्ध्यातून सोडली शाळा; म्हातारपणी आई-वडील मजुरीवर

कुटुंबाची जबाबदारी उचलणाऱ्या तरूणाने बहिणीच्या विवाहात झालेले कर्ज फेडले. आई-वडिलांना तो मुलगा म्हातारपणीची काठी बनल्याचा आनंद झाला, मात्र आता तो गावात सहज मिळणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेल्याने वयाच्या ६० वर्षांनंतर त्या आई-वडिलांना पुन्हा मजुरीवर जावे लागत आहे. ही व्यथा आहे मोरवंची (ता. मोहोळ) गावातील एका कुटुंबाची.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : गावागावांतील अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री थांबविण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू केले. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान, यामुळे आता निश्चितपणे व्यसनाच्या आहारी गेलेला मुलगा, पती, नातू सुधारेल अशी अनेकांना आशा होती. कुटुंबाची जबाबदारी उचलणाऱ्या तरूणाने बहिणीच्या विवाहात झालेले कर्ज फेडले. आई-वडिलांना तो मुलगा म्हातारपणीची काठी बनल्याचा आनंद झाला, मात्र आता तो गावात सहज मिळणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेल्याने वयाच्या ६० वर्षांनंतर त्या आई-वडिलांना पुन्हा मजुरीवर जावे लागत आहे. ही व्यथा आहे मोरवंची (ता. मोहोळ) गावातील एका कुटुंबाची.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवैध हातभट्ट्या आहेत. त्याठिकाणी तयार होणारी हातभट्टी कोणकोणत्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जाते, याची माहिती ग्रामीण पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संकलित केली आहे. तरीदेखील, दोन्ही यंत्रणांना ना हातभट्टी निर्मिती थांबविता आली ना विक्री, हे विशेष.

गावागावात पोलिस पाटील, बीट अंमलदार असताना देखील गावागावांमध्ये हातभट्टी विकणाऱ्यांची माहिती पोलिसांना कशी नसते, या प्रश्नाचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुरू केलेली मोहीम आपण पुढे चालविण्यापेक्षा नवीन काहीतरी उपक्रम हाती घेऊन आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात नावलौकिक मिळवावा, अशी स्थिती पहायला मिळत असल्याचा आरोप होत आहे. सर्वाधिक तरूणांचा देश म्हटले जाते, पण तेच तरूण गावातील हातभट्टीच्या आहारी जात असताना देखील यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोरवंचीच्या तरूणाचा संसार उघड्यावर

मोरवंची (ता. मोहोळ) गावात हातभट्टी मिळतेच, याशिवाय त्या परिसरातील शिरापूर, लांबोटी या ठिकाणी देखील अवैध दुकाने आहेत. मोरवंचीतील तो तरूण काही वर्षांपासून हातभट्टीच्या आहारी गेल्याने त्याच्या मोठ्या मुलीला शाळा सोडून द्यावी लागली. दुसरी मुलगी व लहान मुलगा शिक्षकांनी शाळेत दिलेल्या अभ्यासापेक्षा रात्री वडील दारू पिऊन येतो का, याच्याच चिंतेत असतात. त्या तरूणाची पत्नी सध्या कुटुंबांचा गाडा हाकत आहे. अशी व्यथा शेकडो कुटुंबांची आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष घालतील का? असा प्रश्न त्या कुटुंबातील विवाहितांचा आहे.

एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४८ लाखांची हातभट्टी

सोलापूर तालुका पोलिस ठाण्याने १ जानेवारी ते १९ जुलै २०२५ या काळात त्यांच्या हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे टाकले. चोरून हातभट्टी विकणाऱ्यांवरही कारवाई केली. तब्बल एक लाख १९ हजार लिटर गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट केले. दारू विकणाऱ्या ५० जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४८ लाखांची हातभट्टी जप्त केली. चोरून अवैधरित्या गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या पाच जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे. एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही स्थिती आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मारहाण भोवली! अजित पवारांचे राजीनाम्याचे आदेश, कोण आहे सुरज चव्हाण?

Latest Maharashtra News Updates : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

Omar Abdullah: काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या; उमर यांची पुन्हा मागणी, कायदेशीर पर्यायांवर विचार करणार

वर ढगाला लागली कळं, AC लोकलच्या डब्यातून पाणी थेंब थेंब गळं; प्रवाशांमधून संतापाची लाट, CM फडणवीसांनाही VIDEO केला टॅग

Wagholi Traffic Issues : पूर्व प्रवेशद्वारावर कचरा अन्‌ पाणी; वाघोलीत भेडसावतेय वाहतूक कोंडीची समस्या

SCROLL FOR NEXT